माझे नाव पायल भाऊसाहेब बांबेरे आहे. मी शिक्षण प्रसारक संस्था संचलित, शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे बी. एड प्रथम वर्ष या वर्गात शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, याची मला पूर्ण जाणीव आहे. अध्यापन करताना केवळ पाठ्यपुस्तकापुरते ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता, आत्मविश्वास व नैतिक मूल्ये रुजवण्यावर माझा भर असतो. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, त्याच्या क्षमता, आवडीनिवडी ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करणे हे माझे कर्तव्य आहे. विद्यार्थीकेंद्रित व अनुभवाधारित अध्यापन पद्धतींचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी वआनंददायी बनवण्याचा मी सतत प्रयत्न करतो. एक जबाबदार, संवेदनशील व प्रेरणादायी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करणे हेच माझे ध्येय आहे.
Vision
विदयार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि सर्जनशीलता वाढवून त्यांना भविष्यातील नवनवीन आव्हानासाठी तयार करणे.
Mission
विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनवण्यासाठी तयार करणे.
विद्यार्थ्यांसाठी मुक्त वातावरण निर्माण करणे, जिथे विदयार्थी मोकळेपणाने प्रश्न विचारू, शकतील आणि चुकांमधुन शिकु शकतील.
Teaching Philosophy
विदयार्थ्यांच्या गरजा, शिकण्याची गती आणि क्षमता यावर लक्ष केंद्रित करणे. विद्यार्थ्यांना केवळ श्रोते न ठेवता, त्यांना गट चर्चा आणि प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन करणे. प्रत्येक विदयार्थी हा वेगळ्या पद्धतीने शिकतो, त्यामुळे मी केवळ व्याख्यान पध्दतीवर अवलंबून न राहता, कथाकथन, प्रात्यक्षिके, विडिओ यांचा वापर करून शिकवेन. त्यामुळे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांन पर्यंत माहिती किव्वा विषय पोहोचेल.
वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांला त्यांच्या सामाजिक, भावनिक ,आर्थिक किंवा शारिरीक फरकाचा विचार न करना, सर्वांना समान आदर आणि संधी मिळेल याची खात्री करेन. फक्त माहिती देणे हे उद्दिष्ट नसून विद्यार्थ्याला 'कसे' आणि 'का' या बद्दल विचार करण्यास प्रवृत्त करेन.