Course 101 Practical PDF File
मुलांच्या स्क्रीन वापरायच्या सवयींचा अभ्यास करणे.
मुलांचा स्क्रीन वापर किती आणि कशासाठी आहे जाणून घेणे.
अतिकीत टाइमचे आरोग्यावर व वर्तनावर होणारे परिणाम समजावणे.
योग्य स्क्रीन वापरासाठी उपाय सुचवणे पालक व शिक्षक यांचा योग्य मार्गदर्शन देणे.
संतुलित डीजीटल जीवनशैलीचे महत्त्व पटवून देणे
मुलाच्या स्क्रीन टाइमची ३–५ दिवसांची मीडिया डायरी ठेवणे व त्यासोबत मुलाची किंवा पालकांची मुलाखत घेणे हे प्रात्यक्षिक अत्यंत उपयुक्त व वास्तवाशी जोडलेले आहे. या उपक्रमामुळे मुलांचा संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन व इंटरनेटचा वापर किती वेळ व कोणत्या उद्देशाने होतो याची स्पष्ट माहिती मिळाली. शैक्षणिक वापर व मनोरंजनातील फरक समजला तसेच जास्त स्क्रीन टाइममुळे अभ्यास, आरोग्य, झोप व वर्तनावर होणारे परिणाम लक्षात आले. मुलाखतीद्वारे पालकांचे मत, त्यांच्या अपेक्षा आणि स्क्रीन टाइम नियंत्रित करताना येणाऱ्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
Reflective Note
Strength (बलस्थाने)
पाच दिवसांच्या नोंदीमधून स्क्रीन टाइमचे पॅटर्न, निवडलेले कंटेट वेळेनुसार होणारे बदल आणि पालकांची भूमिका यांचा स्पष्ट अभ्यास करता आला.
Learning Experience (अध्ययन अनुभव )
जास्त स्क्रीन टाइम मुलांच्या आरोग्यावर आणि लक्ष केंद्रीकरणावर परिणाम होतो हे प्रत्यक्ष निरिक्षणातून कळले.
Challenges (आव्हाने)
विदयार्थ्यांचा स्क्रीन वापर सतत बदलत असल्यामुळे माहिती मिळवण्यासाठी दिवसातून अनेक वेळा नौंद कराव्या लागत होत्या.
Improvement (सुधारणा)
मुलाखत पूर्वी मुलांशी मैत्रीपूर्ण, संवाद साधून त्यांचा संकोच दूर केला न अजून चांगले व प्रामाणिक उत्तरे मिळू शकतात.