Practical Name: Orientation, Activities and Report Writing
प्रात्यक्षिक उद्दिष्टे
विविध प्रकारच्या शैक्षणिक व साहित्यिक मजकुराचे अर्थपूर्ण वाचन करणे.
वाचनातून मुख्य कल्पना, आशय व संदेश समजून घेण्याची क्षमता विकसित करणे.
वाचलेल्या मजकुरावर चिकित्सक विचार (Critical Thinking) करणे.
मजकुरातील विचारांचे विश्लेषण, तुलना व मूल्यमापन करण्याची सवय लावणे.
स्वतःचे मत, अनुभव व भावना मजकुराशी जोडून चिंतन करणे.
वाचनातून भाषिक कौशल्ये व शब्दसंपत्ती वाढविणे.
विचार व्यक्त करण्याची व लेखी अभिव्यक्तीची क्षमता विकसित करणे.
विविध लेखकांचे दृष्टिकोन व मूल्ये समजून घेणे.
सामाजिक, शैक्षणिक व नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे.
स्व-अध्ययन व आजीवन शिक्षणाची वृत्ती विकसित करणे.
वाचनातून आत्मपरीक्षण व आत्मविकास साधणे.
Practicals
Practical I: Reading Day Orientation
Practical II: Group Discussion
Activities
Activity I: One Book Analysis
Activity II: One Poem Analysis
Course 106 B: अभिप्राय
Reading and Reflecting on Texts या कोर्सअंतर्गत कविता व पुस्तक वाचन, समूहचर्चा आणि Reading Day Orientation हे उपक्रम अत्यंत उपयुक्त व अर्थपूर्ण ठरले. एका कवितेच्या वाचनामुळे भावनात्मक जाण, कल्पनाशक्ती आणि भाषिक संवेदनशीलता वाढली, तर पुस्तक वाचनातून विचारांची खोली, जीवनमूल्ये व चिंतनशील दृष्टिकोन विकसित झाला. समूहचर्चेमुळे विविध मते ऐकण्याची सवय लागली, संवादकौशल्य वाढले आणि विचार मांडण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. Reading Day Orientation मुळे वाचनाची गोडी निर्माण होऊन वाचनसंस्कृतीचे महत्त्व स्पष्ट झाले.
Reflective Notes
Strength (बलस्थाने )
मराठी वाचनाची आवड असल्यामुळे काव्यवाचनातील भाव समजून घेणे सोप्पे झाले
Learning Experience (अध्ययन अनुभव)
प्रत्येक काव्यपंक्तीचा अर्थ समजला .
Challenges (आव्हाने )
कवितेत लपलेला भावार्थ समजून घेणे कठीण गेले.
Improvement (सुधारणा)
कवितेला योग्य स्वर, ताल लावने गरजेचे आहे .