Practical Name: Textbook analysis (General Science)
Course 103-08 Practical PDF
( General Science)
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे नैसर्गिक घटकांचे ज्ञान व त्यांचे दैनंदिन जीवनातील उपयोग समजावणे
निरीक्षण, वर्गीकरण, तुलना व निष्कर्ष काढण्याची वैज्ञानिक कौशल्ये वाढवणे
प्रायोगिक शिक्षणावर भर देऊन संकल्पना स्पष्ट करणे
पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता व जबाबदारीची भावना निर्माण करणे
प्रश्नोत्तर, उपक्रम व कृतींमधून विचारशक्ती आणि तर्कशक्ती विकसित करणे
विज्ञान विषयाबद्दल आवड व जिज्ञासा निर्माण करणे
आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेविषयी योग्य सवयी लावणे
शालेय ज्ञानाचे जीवनाशी संबंध जोडणे समस्या निराकरण क्षमता विकसित करणे
सहकार्य, समूहकार्य व संवादातून सामाजिक कौशल्ये वाढवणे पुढील इयत्तांसाठी आवश्यक मूलभूत संकल्पनांची तयारी करून देणे
103-08 Evaluation Key
103-08 Practical Index
103-08 Question Paper
103-85=15
Evaluation key
Course 103-08 :अभिप्राय
इयत्ता सातवीचे विज्ञान पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या वय, बौद्धिक पातळी आणि जिज्ञासेला अनुरूप असे आहे. पाठ्यपुस्तकातील संकल्पना सोप्या भाषेत मांडलेल्या असून उदाहरणे व उपक्रम दैनंदिन जीवनाशी जोडलेले आहेत. त्यामुळे विज्ञान विषय अधिक समजण्यास सोपा व रंजक वाटतो. विविध प्रयोग, कृती व निरीक्षणाधारित प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. पर्यावरण संरक्षण, आरोग्यविषयक जाणीव व नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर यांसारख्या मूल्यांचा योग्य समावेश करण्यात आलेला आहे. आकृत्या, तक्ते व सराव प्रश्न यामुळे अध्ययन प्रक्रिया परिणामकारक बनते. एकूणच हे पाठ्यपुस्तक ज्ञान, कौशल्य व मूल्ये यांचा समतोल साधणारे आहे.
Reflective Note
Strength (बलस्थाने)
अभ्यासक्रमाशी सुसंगत व शास्त्रीय दृष्ट्या अचूक माहिती . प्रयोग, कृती व उपक्रमांमुळे अनुभवाधारित शिक्षणाला चालना मिळाली.
Learning Experience (अध्ययन अनुभव)
विज्ञान पाठ्यपुस्तकाची रचना, घटक व अभ्यासक्रमाशी असलेला संबंध समजला. उद्दिष्टे, आशय, क्रियाकलाप व मूल्यमापन यांचा परस्पर संबंध कळला.
Challenges (आव्हाने)
सर्व घटक (उद्दिष्टे, आशय, मूल्यमापन) एकत्रितपणे तपासताना वेळेचे व्यवस्थापन कठीण गेले.
Improvement (सुधारणा)
कठीण संकल्पनांसाठी अधिक सोपी उदाहरणे व दैनंदिन जीवनाशी संबंधित संदर्भ साधता येईल. चित्रे, तक्ते व आकृत्यांचा वापर अधिक स्पष्ट व आकर्षक करता येईल.