प्रात्यक्षिक उद्दिष्टे
स्वतःच्या गुण, क्षमता व बलस्थाने ओळखणे.
स्वतःच्या कमजोरी व मर्यादा समजून घेणे.
स्वतःच्या भावना, विचार व वर्तनाची जाणीव विकसित करणे.
आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढवणे.
जीवनातील ध्येय व उद्दिष्टे स्पष्ट करणे.
योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.
स्वयंविकास व व्यक्तिमत्त्व विकास साध्य करणे.
समाज व इतरांशी सकारात्मक संबंध निर्माण करणे.
108 A- Practical PDF
Understanding of Self हे practical यामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकाला स्वतःची खरी ओळख करून घेता येते. या practical मधून व्यक्ती आपल्या गुण, दोष, क्षमता, मर्यादा, भावना आणि विचार यांचा सखोल विचार करते. शिक्षक म्हणून अध्यापन करताना केवळ विषयज्ञान पुरेसे नसते, तर स्वतःवर नियंत्रण, संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असणे गरजेचे असते हे समजते. विद्यार्थ्यांशी वागताना, वर्ग व्यवस्थापन करताना किंवा तणावाच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःची भावनिक जाणीव असणे महत्त्वाचे असते, जे या practical द्वारे समजते. शिक्षक म्हणून स्वतःला सतत सुधारण्याची वृत्ती निर्माण होते