Practical Name: Portfolio Development
प्रात्यक्षिक उद्दिष्टे
अध्यापन प्रशिक्षणादरम्यान केलेल्या सर्व शैक्षणिक उपक्रमांची सुव्यवस्थित नोंद ठेवणे.
विद्यार्थी-शिक्षक म्हणून स्वतःच्या प्रगतीचा आलेख समजून घेणे.
अध्यापन कौशल्ये, वर्गव्यवस्थापन व संवादकौशल्य यांचा विकास झाल्याचा पुरावा सादर करणे.
सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा योग्य समन्वय साधणे.
विविध प्रात्यक्षिके, प्रकल्प, उपक्रम व निरीक्षणांचे संकलन करणे.
स्वतःच्या कामातील ताकद व मर्यादा ओळखून सुधारणा करण्याची सवय लावणे.
मूल्यांकन पद्धती व अभिप्रायाच्या आधारे स्वतःचे आत्मपरीक्षण करणे.
भविष्यातील अध्यापन व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे व अनुभव एकत्र ठेवणे.
डिजिटल व लिखित स्वरूपात शैक्षणिक दस्तऐवजीकरणाची सवय विकसित करणे.
एक जबाबदार, चिंतनशील व व्यावसायिक शिक्षक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणे.
108 B Physical Portfolio File PDF
Portfolio Development म्हणजे विद्यार्थी-शिक्षकाने किंवा शिक्षकाने आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासातील महत्त्वाची कागदपत्रे, अनुभव, कौशल्ये, उपक्रम व उपलब्धी यांचे नियोजनबद्ध संकलन व सादरीकरण करणे होय. यामध्ये अभ्यासासोबत प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव, प्रात्यक्षिके, प्रकल्प, अहवाल, चिंतन नोंदी, अभिप्राय आणि मूल्यांकन यांचा समावेश असतो. भविष्यातील शिक्षकत्वासाठी आवश्यक दस्तऐवज सादर करण्याची क्षमता विकसित होते आणि शैक्षणिक अनुभव प्रभावीपणे नोंदवून ठेवता येतात.
course 108 A and B: अभिप्राय
Understanding of self या प्रात्यक्षिकातून मला स्वतःची ओळख, ताकद व मर्यादा, भावनिक जाणीव आणि शिक्षक म्हणून माझी भूमिका स्पष्टपणे समजली. आत्मचिंतनाची सवय लागली व स्व-विकासाची दिशा मिळाली. हे प्रात्यक्षिक मला संवेदनशील, आत्मविश्वासपूर्ण आणि जबाबदार शिक्षक बनण्यासाठी उपयुक्त ठरले.
Portfolio Development यामधे मला माझ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभवांचे दस्तऐवजीकरण करण्याची क्षमता विकसित झाली . विविध प्रात्यक्षिक कार्य, प्रकल्प, अभ्यास नोंदी व मूल्यमापन निष्कर्ष सुव्यवस्थित सादर करण्याचा सराव झाला . या उपक्रमांमुळे माझ्या आत्ममूल्यमापन, नियोजन कौशल्ये आणि व्यावसायिक क्षमता वाढली, तसेच भावी शिक्षकत्वासाठी आवश्यक शैक्षणिक दस्तऐवज तयार करण्याची तयारी झाली. या दोन्ही प्रात्यक्षिकांमधे माझ्या शैक्षणिक, मानसिक आणि व्यावसायिक विकासासाठी मौल्यवान अनुभव मिळाला आणि माझा आत्मविश्वास व कौशल्य वाढवण्यासाठी मदत मिळाली.