Practical Name: Conduct a local Survey to identify the role of formal/informal or nonformal educational agencies
Course 102 Practical PDF file
प्रात्यक्षिक उद्दिष्टे :
कुटुंब रचनेचा अभ्यास करणे - संयुक्त आणि विभक्त कुटुंबातील सदस्यांची संख्या, नाती आणि त्यांची भूमिका समजूण घेणे .
कुटुंबातील आर्थिक स्थिती जाणून घेणे - दोन्ही प्रकारच्या कुटुंबामध्ये उत्पन्नाचे आणि खर्चाचे स्त्रोत कोणते आहेत हे पाहणे.
शैक्षणिक स्तराचा अभ्यास करणे - कुटुंबातील सदस्यांचे शिक्षण, मूलांच्या शिक्षणाबाबतची दृष्टी समजून घेणे.
संवेदनशील आणि सामाजिक सबंध जाणून घेणे - कटुंबातील एकोपा, प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्य किती आहे हे शोधणे.
संयुक्त आणि विभक्त कुटुंबातील फायदे व तोटे ओळखणे दोन्ही प्रकारच्या कटुबांच्या जीवनशैलीतील फरक समजून घेणे.
मुलांच्या विकासावर परिणाम अभ्यासणे - कुटुंबप्रकारामुळे मुलांच्या वर्तन, संस्कार आणि सामाजिक विकासावर होणारा परिणाम पाहणे.
समाजातील बदलत्या कुटुंब रचनेचा अभ्यास करणे -आजच्या काळात संयुक्त कुटुंब कमी का होत आहेत हे जाणून घेणे
Course 102: अभिप्राय
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कुटुंबप्रमुख, पालक आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व खुलेपणाने आपली मते मांडली. त्यांच्या प्रतिसादांमुळे या अभ्यासाला समृद्ध माहिती मिळाली. संयुक्त कुटुंब असो किंवा विभक्त, प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती, अनुभव आणि गरजा वेगवेगळ्या असल्याची जाणीव या सर्वेक्षणातून प्रकर्षाने जाणवली. अनेकांनी संयुक्त कुटुंबातील एकोपा, भावनिक आधार आणि संस्कारांची महत्त्वता अधोरेखित केली तर काहींनी विभक्त कुटुंबातील स्वातंत्र्य, आधुनिकता आणि स्वतंत्र जीवनपद्धतीची गरज स्पष्ट केली. या विविध मतांमुळे समाजातील बदलत्या कुटुंबरचनेचे वास्तविक चित्र समोर आले.
Reflective Note
Strength (बलस्थाने)
विभक्त व संयुक्त कुटुंब या दोन्ही पद्धतींची प्रत्यक्ष तुलना करता आली. विविध वयोगटातील व्यक्तींकडून वास्तववादी व अनुभवाधारित माहिती मिळाली.
Learning Experience (अध्ययन अनुभव )
समाजातील कुटुंबव्यवस्थेतील बदल प्रत्यक्ष अनुभवातून समजले.कोणतीही कुटुंबपद्धती पूर्णतः योग्य किंवा अयोग्य नसते हे समजले.संवाद कौशल्य, प्रश्न विचारण्याची पद्धत आणि निरीक्षणशक्ती वाढली
Challenges (आव्हाने)
ग्रामीण व शहरी कुटुंबांमधील फरक समतोलपणे समाविष्ट करणे आव्हानात्मक ठरले.वेळेअभावी सर्व कुटुंबांशी सविस्तर संवाद साधता आला नाही.
Improvement (सुधारणा)
कुटुंबपद्धतीचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम स्वतंत्र घटक म्हणून अभ्यासता येईल.बदलत्या काळानुसार (पूर्वी व आज) कुटुंबपद्धतीची तुलना करता येईल.