Practical Name: Micro Teaching, Integration, and Stimulation lessons
प्रात्यक्षिक उद्दिष्टे
अध्यापनातील मूलभूत कौशल्यांचा सराव करणे (प्रस्तावना, प्रश्नोत्तर, फळ्यावर लेखन, स्पष्टीकरण इ.)
Microteaching द्वारे एका कौशल्यावर लक्ष केंद्रित करून सुधारणा करणे.
सहाध्यायी व मार्गदर्शकांकडून मिळालेल्या अभिप्रायाचा उपयोग करणे.
विविध अध्यापन कौशल्यांचे एकत्रीकरण (Integration) करून संपूर्ण धडा प्रभावीपणे सादर करणे.
Stimulation lesson मधून विद्यार्थ्यांची उत्सुकता, प्रेरणा व पूर्वज्ञान जागृत करणे.
योग्य अध्यापन साहित्य, शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर करणे .
वेळेचे नियोजन व वर्गव्यवस्थापन कौशल्य विकसित करणे.
विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवून विद्यार्थी-केंद्रित अध्यापन साध्य करणे.
अध्यापनातील आत्मविश्वास, स्पष्टता व संवादकौशल्ये वाढवणे.
उद्दिष्टाधारित अध्यापन करून शिकण्याचे अपेक्षित परिणाम साध्य करणे.
अध्यापनातील त्रुटी ओळखून स्वमूल्यांकन व आत्मपरिक्षण करणे.
भावी शिक्षक म्हणून व्यावसायिक कौशल्यांची पायाभरणी करणे .
105 Micro Teaching Evaluation Key
Microteaching ही शिक्षक प्रशिक्षणातील एक प्रभावी आणि वैज्ञानिक अध्यापन पद्धत आहे. या पद्धतीत प्रशिक्षणार्थी शिक्षक कमी वेळेत, मर्यादित विद्यार्थ्यांसमोर आणि एका विशिष्ट अध्यापन कौशल्यावर लक्ष केंद्रित करून धडा सादर करतो. साधारणपणे ५ ते १० मिनिटांचा हा लहान धडा असतो. Microteaching मुळे प्रस्तावना, प्रश्नोत्तर, स्पष्टीकरण, फळ्यावर लेखन, वर्गव्यवस्थापन यांसारख्या कौशल्यांचा स्वतंत्रपणे सराव करता येतो. अध्यापनानंतर मार्गदर्शक व सहाध्यायींकडून मिळणाऱ्या तत्काळ अभिप्रायामुळे शिक्षक आपल्या त्रुटी ओळखू शकतो व सुधारणा करू शकतो. पुनर्नियोजन व पुनःअध्यापनामुळे अध्यापन अधिक प्रभावी बनते. त्यामुळे Microteaching ही प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवणारी, अध्यापन कौशल्ये विकसित करणारी आणि भावी शिक्षक घडवण्यासाठी उपयुक्त अशी पद्धत मानली जाते.