Practical Name: Textbook analysis (Mathematics )
Course 104-09 Practical PDF (Mathematics)
विद्यार्थ्यांमध्ये गणितीय विचारशक्ती व तर्कशक्ती विकसित करणे.
संख्याज्ञान, भिन्न, दशांश, प्रमाण, टक्केवारी यांची मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे.
बीजगणितीय संकल्पना (चल, समीकरणे) समजून घेण्याची तयारी करून देणे.
भूमितीतील आकृती, कोन, रेषा, क्षेत्रफळ यांचे अवबोधात्मक ज्ञान देणे.
दैनंदिन जीवनाशी संबंधित उदाहरणांतून गणिताचा उपयोग समजावणे.
समस्या सोडवताना पद्धतशीर विचार व अचूकता वाढवणे.
गणिती भाषा, चिन्हे व सूत्रांचा योग्य वापर शिकवणे सराव, उपक्रम व प्रश्नसंचाद्वारे स्व-अभ्यासाची सवय लावणे.
समूहकार्य, चर्चा व उपक्रमांतून संवाद व सहकार्य कौशल्ये विकसित करणे.
आत्मविश्वास वाढवून गणिताची भीती कमी करणे पुढील इयत्तांसाठी आवश्यक पायाभूत तयारी करून देणे.
मूल्ये जसे की संयम, चिकाटी व शिस्त रुजवणे.
104-09 Evaluation key
104-09 Practical Index
104-09 Quetion Paper
104-85=15 Evaluation key
Course 104-09 :अभिप्राय
गणिताच्या पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण केल्यावर असे लक्षात येते की पुस्तकाची रचना विद्यार्थीकेंद्रित व क्रमबद्ध आहे. संकल्पना सोप्या भाषेत, टप्प्याटप्प्याने मांडलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजणे सुलभ जाते. प्रत्येक घटकाची सुरुवात पूर्वज्ञानावर आधारित उदाहरणांनी केली असल्याने नवीन संकल्पना आत्मसात करण्यास मदत होते. उदाहरणे, आकृत्या, तक्ते आणि सराव प्रश्न यांचा समतोल वापर करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे तर्कशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि गणितीय विचारशैली विकसित होते.
Reflective Note
Strength (बलस्थाने)
अभ्यासक्रमाशी सुसंगत व गणितीय दृष्ट्या अचूक माहिती दिलेली आहे. संकल्पनांची क्रमवार मांडणी समजली.
Learning Experience (अध्ययन अनुभव )
अध्यापन उद्दिष्टे व मूल्यमापन यांचा परस्पर संबंध स्पष्ट झाला.संकल्पना कशा टप्प्याटप्प्याने मांडल्या आहेत हे लक्षात आले.
Challenges (आव्हाने)
काही अध्यायांतील संकल्पना जसे बीजगणित, भूमिती विश्लेषित करताना कठीण वाटल्या. सर्व अध्यायांचे सखोल विश्लेषण करताना वेळेचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक ठरले.
Improvement (सुधारणा)
कठीण संकल्पनांसाठी अधिक सोपी व दैनंदिन जीवनाशी संबंधित उदाहरणे देता येतील. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी अधिक विचारप्रवर्तक व अनुप्रयोगाधारित प्रश्न समाविष्ट करता येतील. आकृत्या व तक्ते अधिक स्पष्ट व आकर्षक करता येतील.