REFLECTIVE NOTES
Strengths (बलस्थाने )
Google Slides च्या सहाय्याने पोर्टफोलिओ अधिक सुव्यवस्थित व सुस्पष्ट बनवता आला. योग्य स्लाईड डिझाईन, फॉन्ट आणि रंगसंगतीचा वापर करून सादरीकरण अधिक प्रभावी करता आले. डिजिटल स्वरूपात पोर्टफोलिओ तयार केल्यामुळे त्यात बदल करणे व अद्ययावत ठेवणे सोपे झाले.
Learning Experience (अध्ययन अनुभव )
या उपक्रमातून डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, माहितीचे नियोजन व सुसंगत सादरीकरण कसे करावे हे शिकायला मिळाले. कोणती माहिती महत्त्वाची आहे, ती कशा प्रकारे मांडावी आणि तिचा क्रम कसा ठेवावा याची स्पष्टता आली. वेळ व्यवस्थापन व नियोजनाचे महत्त्वही लक्षात आले.
Challenges (आव्हाने )
सुरुवातीला Google Slides मधील विविध फिचर्स समजून घेणे आणि त्यांचा योग्य वापर करणे थोडे आव्हानात्मक वाटले. इटरनेट कनेक्शनची अडचण, योग्य फॉन्ट व लेआउरची निवड आणि माहिती जास्त न होता नेमकी मांडणं ही आव्हाने होती. तसेच प्रत्येक स्लाइडमध्ये संतुलन राखणेही कठीण गेले.
Improvements (सुधारणा )
पुढील काळात पोर्टफोलिओ अधिक स्पष्ट, सुटसुटीत आणि व्यावसायिक बनवण्याचा प्रयत्न करेन. डिजिटल कौशल्ये अधिक विकसित करून योग्य फॉरमॅट, मांडणी व सादरीकरणावर भर देईन, मजकूर कमी व आशयपूर्ण ठेवण्यावर अधिक भर देईन.